सर्वसामान्यांना बसणार झटका ! पेट्रोल-डिझेलवर 6 रुपयांपर्यंत वाढू शकते एक्साइज ड्यूटी, होणार थेट परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मोठा झटका बसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवण्याच्या तयारीत आहे. सरकार 3-6 रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवू शकते. यापूर्वी सरकारने मे महिन्याच्या दरम्यान पेट्रोलवर 10 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लीटर एक्साइज ड्यूटी वाढवली होती.

मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकुण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोलवर टॅक्स वाढवून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवर टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर आहेू. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे लागोपाठ टॅक्स वाढवला गेल्याने क्रुड ऑईल स्वस्त होण्याचा फायदा ग्राहकांना दिला जात नाही, उलट त्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.

जाणून घ्या पेट्रोलवरील टॅक्स आणि कमीशन…

एक्स फॅक्टरी किंमत – 25.32 रुपये
भाडे व अन्य खर्च -0.36 रुपये
एक्साईज ड्यूटी -32.98 रुपये
डिलरचे कमीशन- 3.69 रुपये
वॅट (डिलरच्या कमीशनसोबत) – 18.71 रुपये

काय होणार आता

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान कमी करण्यासाठी सरकार तिसर्‍या मदत पॅकेजची तयारी करत आहे. अशावेळी सरकारला जास्त फंडची गरज आहे. सरकारला याची भरपाई टॅक्स (एक्साइज ड्यूटी) मधून करायची आहे.

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने जेवढे पेट्रोल-डिझेल स्वस्त व्हायला हवे होते ते आता होणार नाही. अंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल 45 डॉलर प्रति बॅरलवरून घसरून 40 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. याचा फायदा आता सर्वसामान्यांना न देता स्वत: मोदी सरकार घेणार आहे.

You might also like