1 एप्रिलपासून देशात विकलं जाणार जगातील सर्वात ‘प्यूअर’ पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – 1 एप्रिल 2020 पासून भारतात जगातील सर्वात साफ पेट्रोल आणि डिझेल विकले जाईल. सरकारी तेल कंपन्या देशभरात यूरो – 6 ग्रेड डीझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करेल. भारताने फक्त 3 वर्षात पेट्रोल साफ करण्याच्या तंत्रज्ञानात यश मिळवले आहे. जगातील कोणतीही मोठी अर्थव्यवस्था असे करु शकलेली नाही. 1 एप्रिल 2018 पासून दिल्ली आणि एनसीआरमध्ये सरकारी तेल कंपन्या यूरो – 6 ग्रेड डीझेल आणि पेट्रोल विकणार आहे.

2015 मध्ये सरकारने 1 एप्रिल 2020 पासून यूरो – 6 उत्सर्जन मानदंड लागू करण्याचा निर्णय दिला होता, ज्यानंतर बीएस – 6 पेट्रोल आणि डिझेलची विक्री होईल, तर सध्या यूरो – 4 ग्रेडची विक्री होत आहे.

याने काय होईल –
देशातील अनेक मोठ्या शहरात वायू प्रदुषणाचा स्तर ऊचांकीवर आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी राजधानीच्या दुसऱ्या भागात पहिल्यांदाच स्वच्छ इंधनाची व्यवस्था केली गेली आहे. माहितगारांचे म्हणणे आहे की यूरो – 6 पेट्रोल – डिझेलची विक्री सुरु झाल्यानंतर प्रदूषणाचा स्तर कमी होऊ शकतो.

तेल कंपन्यांनी सुरु केले स्वच्छ इंधन –
देशात 50 टक्क्यापेक्षा जास्त पेट्रोल पंपच्या माध्यमातून इंधन पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी आयओसीचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले की कमी सल्फर असलेले पेट्रोल आणि डिझेल प्रोडक्शन 2019 च्या अंतापासून सुरु केले होते. तेल कंपन्यांनी आता देशातील इंधनाचा प्रत्येक थेंब नव्यात इंधनात बदलण्याचे काम पूर्ण केले आहे.

आयओसी चेअरमन म्हणाले की 1 एप्रिलपासून बीएस 4 इंधनाच्या पूर्ततेसाठी मार्गावर आहेत. जवळपास सर्व रिफायनरीमध्ये बीएस 6 चे इंधन सुरु केले जाईल आणि देशभरात डेपोंपर्यंत पोहचवण्यात येईल.

पुढील काही आठवड्यात बीएस – 6 ग्रेड पेट्रोल आणि डिझेल पंपावर पोहचतील. आम्ही 100 टक्के अश्वस्त आहोत की 1 एप्रिलपासून संपूर्ण देशात बीएस 6 एफिशिएंट पेट्रोल आणि डिझेल मिळेल. भारताने यूरो 3 समतूल्य इंधन स्वीकारले आहे. 2010 मध्ये 350 पीपीएमच्या सल्फर साम्रगी आणि त्यानंतर बीएस 4 स्वीकारण्यास 7 वर्ष लागले ज्यात 50 पीपीएम सल्फर सामग्री असायची. तर बीएस – 4 वरुन बीएस – 6 स्वीकारण्यास तीन वर्ष लागली.

You might also like