Petrol-Diesel New Rates | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी; प्रमुख शहरांतील आजचा दर किती?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel New Rates | मागील अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel New Rates) वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाल्याचे दिसत आहे. दरम्यान आज (शनिवारी) मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Company) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले आहेत.

 

”जोपर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल 110 डॉलरपेक्षा कमी आहे, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार नाहीत. कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून त्याचा भार सहन करावा लागेल. अशा परिस्थितीत आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे.” असं मागील महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागारांनी (Chief Financial Advisor) म्हटलं होतं. (Petrol-Diesel New Rates)

 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असताना तेल पुन्हा महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आज देखील दिल्ली, मुंबई (Mumbai) आणि देशातील प्रमुख शहरांसह चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती स्थिर असल्याचं दिसत आहे. दरम्यान, तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळणार आहे.

 

पेट्रोल-डिझेल आजचा दर (प्रति लीटर) –

मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल – 100.94 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel New Rates | petrol diesel prices new rates of petrol and diesel released

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा