Petrol Diesel | ‘पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार, पण…’, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel) जीएसटीच्या कक्षेत (GST Tax) आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे सांगितले. पण यावर सर्व राज्यांची सहमती गरजेची असल्याचे देखील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी (Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी स्पष्ट केलं. राज्यांनी यावर पुढाकार घेतला तर केंद्र सरकार त्यावर (Petrol Diesel) तातडीने कार्यवाही करेल.

हरदीप सिंह पुरी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel) जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) तयार आहे. मात्र, यासाठी सर्व राज्यांनी सहमती देणं आवश्यक आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतामध्ये दारु (Alcohol) आणि इंधनाचा (Fuel) समावेश असल्याने त्यावर राज्य सरकार (State Government) पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे इंधनाला जीएसटीच्याकक्षेत आणण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी केली जात आहे.

मागील अनेक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
परंतु इंधनावरील करांमधून राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल (Revenue) मिळतो.
त्यामुळे इंधन जर जीएसटीच्या कक्षेत आलं तर राज्यांचा मोठा महसूल बडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी राज्यांचे अर्थमंत्री (Finance Minister) तयार होणार नाहीत,
असंही पुरी यांनी म्हटलं आहे. आपण एका संघराज्य व्यवस्थेत राहतो.
त्यामुळे केंद्रासोबत राज्यांच्याही मताचा विचार केला पाहिजे असेही पुरी यांनी म्हटले.

 

Web Title :- Petrol Diesel | petrol diesel under gst tax centre ready to bring fuel under gst tax says petroleum minister hardeep singh puri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stand-Up Comedian Veer Das | स्टँड-अप कॉमेडियन वीर दासने पुन्हा रद्द केला शो, कारण ऐकुन तुम्हालाही य़ेईल हसु

Actress Neha Sharma | नेहा शर्माच्या बोल्ड स्टाइलसमोर या अभिनेत्री पडतात फिक्या, पहा तिचा हॉट लुक

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे