खुशखबर ! 2 महिन्यांतील पेट्रोल-डिझेल दराची ‘निच्चांकी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. आजही (24 जानेवारी) पेट्रोल 22 पैशांनी स्वस्त झाले आहे, तर डिझेलच्या किंमतीत 25 पैशांवरून 33 पैसे घसरण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे सामान्य माणसांना दिलासा मिळत आहे. काल गुरुवारी पेट्रोलचे दर 17 पैसे आणि डिझेल दर 23 पैशांनी कमी झाले.

पेट्रोल आणि डिझेलचे दर –
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत पेट्रोल – 74.43 रुपये, मुंबई – 80.03 रुपये, कोलकाता- 77.31 रुपये आणि चेन्नईमध्ये 77.31 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच या चार शहरांत डिझेलचे दर अनुक्रमे 67.61 रुपये, 70.88 रुपये, 69.97 रुपये आणि 71.43 रुपये प्रति लीटर आहेत. दरम्यान, सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत लागू होते. त्यांच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

SMS द्वारे घरबसल्या जाणून घ्या पेट्रोलचे दर –
आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून पाहायचे असतील तर 92249 92249 या क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी, आपल्याला RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. जर आपण दिल्लीत असाल आणि आपल्याला संदेशाद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घ्यायची असेल तर आपल्याला RSP 102072 लिहून 92249 92249 क्रमांकावर पाठवावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like