Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल-डिझेल  (Diesel Petrol ) च्या वाढत्या किमतींनी सध्या सर्व विक्रम मोडले आहेत. दोन दिवसानंतर आज पुन्हा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आज 4 जूनला सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल ( Diesel Petrol ) 27 पैसे प्रति लीटर तर, डिझेल 28 पैसे प्रति लीटर महाग केले आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 100.98 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे. यापूर्वी 1 जूनरोजी पेट्रोल-डिझेलच्या दराने उसळी घेतली होती.

जून महिन्यात पेट्रोल-डिझलचे दर दोन वेळा वाढवण्यात आले तर मे महिन्यात तब्बल 17 वेळा वाढ झाली.
या वाढीनंतर पेट्रोल 4.17 रुपये प्रति लीटरने महाग झाले.
तर डिझेलच्या रेटमध्ये सुद्धा 4.60 रुपयांची वाढ दिसून आली.
अनेक शहरात सध्या पेट्रोलचे दर 100 रुपए प्रति लीटरच्या पुढे गेले आहेत.

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे.
या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते.
ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते.
या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात.
मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे