खुशखबर ! पेट्रोल-डिझेल झालं आणखी ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आतंरराष्ट्रीय कमॉडिटी खनिज तेल स्वस्त झाल्यानं पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात गुरुवारी कपात केली आहे. चीनमधील कोरोना व्हायरसचा कमॉडिटी बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. यामुळे आता चीनची तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी पेट्रोलमध्ये 23 ते 25 पैसे तर डिझेलमध्ये 22 ते 24 पैशांनी घट झाली आहे. गेल्या 17 दिवसांबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल 2 रुपये 44 पैसे आणि डिझेल 2 रुपये 70 पैशांनी स्वस्त झालं आहे.

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात तेलाच्या किंमती कमी होत असल्यानं पेट्रोलियम कंपन्या 12 जानेवारी पासून इंधन दर कमी करताना दिसत आहेत. म्हणूनच गेल्या 17 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण झाल्याचं दिसून आलं. गुरुवारी खनिज तेलाच्या किंमतीत 24 सेंट्सनी घट झाली आहे. खनिज तेलाचा (युएस क्रु़ड आईलचा) दर 59.57 डॉलर प्रति बॅलर आहे. गुरुवारी देशभरात पेट्रोलमध्ये 23 ते 25 पैसे तर डिझेलमध्ये 22 ते 24 पैशांनी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये खनिज तेलाचा भाव 52.15 डॉलर प्रति बॅलर होता. ऑक्टोबरनंतरचा आजचा भाव सर्वात निचांकी स्तर आहे. चीनमधील कोरोनाचा खनिज तेलाच्या उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रमुख शहरातील इंधन दर

शहर – पेट्रोल – डिझेल
मुंबई – 78.97 – 69.56
नवी दिल्ली – 73.36 – 66.36
चेन्नई – 76.19 – 70.09
कोलकाता – 75.99 – 68.72