खुशखबर ! महाराष्ट्र आणि दिल्लीवाल्यांना मिळणार स्वस्त पेट्रोल-डिझेल, GST च्या कक्षेत आणण्यासाठी तयार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येत असेल तर यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना फायदा मिळेल. याशिवाय राज्य सरकारने म्हटले की, जर केंद्राने अशाप्रकारचा निर्णय घेतला तर महाराष्ट्र सरकार त्याचे पूर्ण समर्थन करेल.

मनी कंट्रोलच्या वृत्तनुसार, दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधूडी यांनी चर्चेदरम्यान म्हटले की, जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर किंमतीमध्ये सुमारे 25 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केली होती मागणी
याशिवाय दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी विधानसभेत म्हटले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी अगोदरच केली आहे.

सत्येंद्र जैन यांनी पुढे म्हटले की, एक प्रतिनिधी मंडळ घेऊन केंद्र सरकारशी पुढील चर्चा केली पाहिजे. याशिवाय आम आदमी पार्टीचे आमदार सोबत राहतील. देशाच्या राजधानीसह संपूर्ण देशाला सरकारच्या या निर्णयाचा फायदा मिळेल.

फेब्रुवारी महिन्यादरम्यान पेट्रोलच्या दरात 16 दिवस वाढ झाली. यामुळे ते 4.74 रुपये महागले. मुंबईत तर पेट्रोल 97.57 रुपयांवर पोहचले आहे, जो मेट्रो शहरांमध्ये उच्चांक आहे. याच्यासोबतच जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोल सर्वकालीन उच्चस्तरावर गेले आहे. केवळ यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीबाबत बोलायचे तर 25 दिवसातच पेट्रोल 7.36 रुपये महागले आहे.