Petrol Diesel Price । पेट्रोलचा दर 125 रुपये होणार? इंधन दरवाढीवर तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Petrol Diesel Price । मागील काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) दर वारंवार वाढताना दिसत आहे. अशा कोरोनाच्या (corona) परिस्थितीत इंधनाच्या वाढत्या किंमतीने सामान्य जनता हतबल झाली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील परभणी येथील पेट्रोल किंमत 105 पर्यंत मजल मारली होती. इंधनाच्या (Fuel) दरात सतत वाढ होत असल्याने पेट्रोल 7.44 रुपयांनी आणि डिझेल 7.52 रुपयांनी महागले आहे. एकीकडे सरकार सांगत आहे की, इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर ठरत आहे. तर दुसरकडे इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे असं तज्ज्ञाच्या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. petrol diesel price expert says today fuel rate may go upto rs 125 liter till december

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले असून, जून 2020 मध्ये 40 डॉलर असलेले दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. यातच आता 1 जुलैला OPEC+ देशांची बैठक होणार आहे. या बैठकीत उत्पादन धोरणावर निर्णय होणार असून, रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे. तसेच या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) दर कमी होऊ शकतात. महसूल घटल्यामुळे केंद्र सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता फारच धुसर आहे. म्हणून सध्याच्या किमतीनुसार डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लीटर 125 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरामधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई किंमतीवर होतोय. इराणवर अमेरिकेने घातलेल्या बंधनामुळेही कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत राहतात.

 

शुक्रवारी (24 जून) पेट्रोल-डिझेल दर : (Petrol Diesel Price) –

– मुंबई : 1 लीटर पेट्रोल दर -103.89 रुपये, डिझेल – 95.79 रुपये

– दिल्ली : पेट्रोल – 97.76 रुपये.

– चेन्नई : पेट्रोल – 98.88 रुपये, डिझेल – 92.89 रुपये

– कोलकाता : पेट्रोल – 97.63 रुपये, डिझेल – 91.15 रुपये

– भोपाळ : पेट्रोल – 105.99 रुपये, डिझेल – 97 रुपये

Web Title : petrol diesel price expert says today fuel rate may go upto rs 125 liter till december

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime News | कोल्हापूर येथून आलेल्या एकाला लुटणार्‍या 5 जणांना अटक