एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol diesel price hike | तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेल (Petrol Diesel) च्या किंमतीमध्ये शुक्रवारी भाववाढ न करता दिलासा दिल्यानंतर शनिवारी पुन्हा भाववाढ केली आहे. शनिवारी पेट्रोल (Petrol ) च्या दरात लिटरमागे ३० पैशांनी दरवाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.८७ रुपये झाला आहे. Petrol diesel price hike again after a day of rest

डिझेल (Diesel) ही प्रति लिटर ३५ पैशांनी महागले आहे. आता पुण्यात डिझेलचा दर ९४.३४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा पुण्यातील दर आता १०७.५५ रुपये लिटरवर जाऊन पोहचला आहे.

 

Anil Deshmukh | 100 कोटींचे वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सहाय्यकांना अटक

मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२२ रुपये लिटर झाला असून डिझेल ९६.१६ रुपये लिटर दर झाला आहे. भोपाळ मध्ये पेट्रोल १०६.३५ रुपये, डिझेल ९७.३७ रुपये लिटर झाले आहे. रांचीमध्ये सर्वात कमी पेट्रोल ९३.८२ रुपये लिटर आहे.

Web Titel : Petrol diesel price hike again after a day of rest