Good News : ‘या’ राज्यात पेट्रोल झालं 5 रुपयांपर्यंत स्वस्त; तुमचंही राज्य यामध्ये आहे का ? जाणून घ्या

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांची चांगलीच आर्थिक अडचण होत आहे. अनेक राज्यांत पेट्रोलने शंभरी गाठली आहे. या वाढत्या किमतीवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. पण आता देशातील विविध राज्यांत पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

एक्ससाईज ड्युटीमध्ये कपात करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत आहेत. तर देशातील 4 राज्यांत सरकारने टॅक्समध्ये कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असेल तरीही यापैकी काही राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. ते डोळ्यासमोर ठेवूनचा जनतेची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

‘या’ राज्यात पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स केला कमी

पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालय या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वात आधी राजस्थानात 29 जानेवारीला पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या VAT 38 टक्के कपात करून 36 टक्के केले होता. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणाऱ्या VAT मध्ये एक रुपयाची कपात केली आहे. 12 फेब्रुवारीला आसाम राज्य सरकारने गेल्या वर्षी कोरोना महामारीदरम्यान लावण्यात आलेल्या 5 रुपयांचा ऍडिशनल टॅक्स काढून टाकला आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय?

– दिल्लीत पेट्रोल 90.58 रुपये आणि डिझेल 80.97 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 97.00 रुपये तर डिझेल 88.06 रुपये प्रति लिटर

– कोलकाता येथे पेट्रोल 91.78 रुपये आणि डिझेल 84.56 रुपये प्रति लिटर

– चेन्नईत पेट्रोल 92.59 रुपये आणि डिझेल 85.98 रुपये प्रति लिटर

– नोएडा येथे पेट्रोल 88.92 रुपये आणि डिझेल 81.41 रुपये प्रति लिटर

– बंगळुरुत पेट्रोल 93.61 रुपये आणि डिझेल 85.84 रुपये प्रति लिटर