Petrol Diesel Price Hike | उद्यापासून बसणार महागाईचा जोरदार झटका? पेट्रोल-डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लीटरपर्यंत होऊ शकते वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol Diesel Price Hike | 8 मार्च 2022 पासून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा पडणार आहे. कारण 8 मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकणार आहेत. कारण 8 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ होऊ शकते. कारण रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 14 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. (Petrol Diesel Price Hike)

 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची शेवटची फेरी 7 मार्च रोजी संपणार आहे.
ज्यानंतर सरकार सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास ग्रीन सिग्नल देईल,
त्यानंतर तेल कंपन्या दर वाढवण्यास सुरुवात करतील.

 

किती महाग होईल पेट्रोल – डिझेल
असा अंदाज आहे की मंगळवार 8 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज पुन्हा वाढ होऊ शकते.
कच्च्या तेलाच्या दरात प्रत्येक डॉलरच्या वाढीमुळे सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 40 पैशांनी वाढवतात. (Petrol Diesel Price Hike)

1 डिसेंबर 2021 रोजी प्रति बॅरल 68 च्या नीचांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर, कच्चे तेल आता प्रति बॅरल 139 वर आले आहे.
म्हणजेच गेल्या 97 दिवसांत कच्च्या तेलाची किंमत 69 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली आहे.

कच्च्या तेलाच्या दरात 5 डॉलरपर्यंत वाढ झाल्यानंतर पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी महागले आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरमधील कमजोरीही पाहिली तर सरकारी तेल कंपन्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान 25 रुपयांनी वाढ करावी लागेल.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही वाढ भारतीयांना सर्वाधिक त्रासदायक ठरणार आहे, हे स्पष्ट आहे.
भारत आपल्या इंधनाच्या गरजेपैकी 80 टक्के इंधन आयात करतो.

कच्चे तेल आणखी महागणार
रशियाकडून होणारा तेल पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने 2008 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती 139 प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत.
जेपी मॉर्गन यांनी भाकीत केले आहे की जर 2022 मध्ये संपूर्ण वर्षभर रशियाकडून होणारा पुरवठा असाच सुरू राहिला तर या वर्षी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 185 च्या किमतीला स्पर्श करू शकते.

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर लगाम बसला तेव्हा कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 81.5 इतकी होती.

 

चार महानगरांमध्ये पेट्रोल – डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये आहे.

मुंबईकरांना पेट्रोलसाठी 109.98 रुपये आणि डिझेलसाठी 94.14 रुपये मोजावे लागतात.

चेन्नईमध्ये पेट्रोलसाठी प्रति लिटर 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये मिळत आहे.

 

महागाई भयंकर वाढणार
कोलकात्याच्या जनतेला पेट्रोलसाठी 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेलसाठी 89.78 रुपये मोजावे लागतात.
ही आजची किंमत आहे, जरा विचार करा, निवडणूक संपल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवायला सुरुवात केली, तर देशात प्रचंड महागाई वाढेल.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike | petrol diesel price hike by rs 25 per litre by oil companies likely after last phase of assembly elections crude oil at 139 dollar per barrel

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा