Petrol Diesel Price Hike | महागाईचा भडका ! 4 नोव्हेंबरनंतर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत प्रथमच वाढ; जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike | दिवाळीमध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात १० रुपयांची कपात केली होती. पाठोपाठ ५ राज्यातील निवडणुका आल्याने इंधनाच्या दरवाढीवर केंद्र सरकारने निर्बंध लादले होते. आता निवडणुका संपल्यानंतर १० दिवसांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price Hike)

 

पुणे शहरात पेट्रोल लिटरमागे ७५ पैशांनी महागले आहे. आजपासून पुण्यातील पेट्रोलचा दर प्रति लिटर ११०.३५ रुपये असणार आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता पॉवर पेट्रोलचा दर ११४.८५ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Hike)

 

पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दरात प्रति लिटर ७४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा दर आता ९३.१४ रुपये लिटर झाला आहे.
सीएनजीच्या दरात आजतरी वाढ करण्यात आलेली नाही. सीएनजीचा दर ६६ रुपये किलो इतका आहे.

 

चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. रशिया, युक्रेनच्या युद्धामुळे इंधनाच्या जागतिक वाहतूकीवर परिणाम झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, भारतात केंद्र सरकारने त्या प्रमाणात देशांतर्गत दरवाढ करण्यास रोक लावली होती. आता हे निर्बंध दूर करण्यात आल्याचे आजच्या दरवाढीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे ही दरवाढ गेल्या वर्षीप्रमाणे दररोज अनुभवायला येणार का आणि ही दरवाढ किती दिवस सुरु राहणार, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike | petrol diesel prices hike by 75 paisa per liter in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा