Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाल्याचे कारण देत तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरातील वाढ सलग पाचव्या दिवशी कायम ठेवली आहे.

 

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३१ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे आज पुण्यातील पेट्रोलचे दर ११३.६९ रुपये लिटरवर पोहचले आहेत. पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर ११८.१९ रुपये लिटर झाला आहे.

 

 

 

डिझेलच्या दरातही ३५ पैशांनी लिटरमागे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता डिझेलचा आजचा दर ९६.५६ रुपये लिटर इतका झाला आहे.

 

Web Title : – Petrol Diesel Price Hike Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा