Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरातील भाववाढ अतिवेगवान; सलग सातव्या दिवशी दरवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ करण्याचा चंगच बांधला असून निवडणुका संपल्यानंतर आता त्यांच्यावर कोणाचेही निर्बंध राहिले नसल्याचे दिसून येत आहे. मागील वेळेच्या तिप्पट वेगाने दररोज भाववाढ होत असून त्यामुळे महागाई कळस गाठण्याची शक्यता आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

 

तेल कंपन्यांनी बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात लिटरमागे तब्बल ८३ पैशांनी वाढ केली. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचा दर ११५.३६ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलमध्ये प्रति लिटर ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११९.८७ रुपये लिटर झाला आहे.

 

डिझेलच्या दरात लिटरमागे ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे डिझेल आता ९७.२८ रुपये लिटर झाले आहे.
डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असल्याने मालवाहतूक करणार्‍या व्यावसायिकांना तसेच डिझेल भट्टीवर काम करणार्‍या उद्योजकांचे सर्व आर्थिक गणित बिघडले आहे.
दरात दररोज होणारी ही वाढ ८० पैशांहून अधिक असल्याने त्याचा भार वाढत चालला आहे.
डिझेलच्या दरात रोज वाढ होत असली तरी व्यावसायिकांना आपल्या मालाच्या किंमती दररोज बदलता येत नाही. भाजीपाल्यासह वेगवेगळ्या वस्तूंची वाहतूक करणार्‍या टेम्पोचालकांनाही या दररोजच्या भाववाढीचा त्रास जाणवू लागला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | petrol and diesel prices rise sharply For the seventh day in a row

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा