Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची गुढी दररोज उंचचउंच जाऊ लागली आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी आणखी उंच गेली आहे.

 

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा लिटरमागे ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर आता ११७.०४ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही ८४ पैशांनी वाढ झाली असून पॉवर पेट्रोलचा दर १२१.५४ रुपये लिटर झाला आहे.

 

डिझेलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आता ९९.७७ रुपये लिटर इतका झाला आहे. त्यात आता उद्या वाढ झाली तर तो शंभरी पार करेल.

 

नोव्हेंबरमध्ये १० रुपयांची कपात केल्यानंतर आता पाच महिन्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव पुन्हा त्याच पातळीवर आले आहेत.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune Today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा