Petrol-Diesel Price Today : एक दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासरकारी इंधन कंपन्यांनी आज (रविवार) चे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) रेटमध्ये वाढ झाली आहे. एक दिवस दिलासा दिल्यानंतर आज (6 जून) दोन्ही इंधन आणखी महागले आहे. स्थानिक बाजारात डिझेलचा दर 29 पैसे प्रति लीटर तर पेट्रोलचा दर 27 पैसे प्रति लीटरने वाढवला आहे. दिल्लीच्या बाजारात आज पेट्रोल 95.03 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.95 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे.

प्रमुख महानगरांमधील आजचे पेट्रोल-डिझेलचे Petrol-Diesel दर

शहर – पेट्रोल – डिझेल
दिल्ली – 95.03 85.95
मुंबई – 101.25 93.10
कोलकाता – 95.02 88.80
चेन्नई – 96.47 90.66

शनिवारी स्थिर होते दर
सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी 5 जूनला पेट्रोल-डिझेलच्या Petrol-Diesel दरात कोणताही बदल केला नव्हता. दिल्ली बाजारात पेट्रोल 94.76 रुपये प्रति लीटर तर डिझेल 85.66 रुपये प्रति लीटरवर होते. 04 जूनला पेट्रोल 27 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटर महाग झाले होते. तर, यापूर्वी गुरुवार आणि बुधवारी सुद्धा इंधनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

कोरोना काळाच्या 15 महिन्यात 23 रुपयांनी महागले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या सरकार किती वसूल करतंय ‘टॅक्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या देशात कोरोनाचा परिणाम मागील वर्षाच्या सुरूवातीपासून दिसण्यास सुरूवात झाली होती. संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात 25 मार्चला पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचे पूर्ण 14 महिने झाले आहेत, आणि या 14 महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाने आणि दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे.(petrol)

पेट्रोल (petrol) -डिझेलच्या रेट बाबत बोलायचे तर 15 महिन्यातच पेट्रोल petrol 23 रुपये प्रति लीटर महागले आहे. अशाच प्रकारे खाद्यतेल सुद्धा चांगलेच महागले आहे. 2 मार्च 2020 ला पेट्रोलचा रेट 71.49 रुपये तर डिझेलचा भाव 64.10 रुपये प्रति लीटर होता.

जाणून घ्या सरकार किती वसूल करत आहे टॅक्स
7 वर्षापूर्वी पेट्रोलच्या petrol किरकोळ किंमतीत सुमारे दोन तृतीयांश भाग कच्च्या तेलाचा असायचा. आज जवळपास इतकाच भाग केंद्र आणि राज्यांच्या टॅक्सेसचा झाला आहे. आकड्यांवरून समजते की, पेट्रोलवर केंद्र सरकार राज्यांपेक्षा जास्त टॅक्स घेत आहे. सरासरी पाहिले तर राज्य सरकारे प्रत्येक लीटरवर सुमारे 20 रुपयांचा टॅक्स घेत आहेत, तर केंद्र सरकार सुमारे 33 रुपये प्रति लीटर. राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर लावलेला विक्री कर किंवा वॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो.

6 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींची रखडलेली कामे होतील पूर्ण, मिळेल भाग्याची पूर्ण साथ; इतरांसाठी असा आहे रविवार