Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लागोपाठ महाग होत असलेल्या पेट्रोल-डिझेलचे (Petrol ) दर सध्या शहरांमध्ये विक्रमी पातळीवर पोहचले आहे. मुंबईत पेट्रोल (petrol) 102 रुपये लीटरच्या जवळ पोहचले आहे. तर काही शहरात हा आकडा सुद्धा पार केला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवसानंतर पुन्हा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात सुद्धा 25 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे.

सोमवारी पेट्रोलचा भाव 24-28 पैसे प्रति लीटर आणि डिझेलचा भाव 26-28 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढवला होता. मे महिन्यापासून इंधनाच्या किंमती सतत वाढत आहेत. मागील 21 दिवसात पेट्रोल 4.99 पैसे प्रति लीटर महाग झाले आहेत. तर, डिझेलचे दर 5.44 रुपये प्रति लीटर वाढले आहेत.

पुणे

मंगळवारी एक दिवस दिलासा दिल्यानंतर तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात आज वाढ केली आहे. पुण्यात पेट्रोलच्या दरात आज  लिटरमागे २४ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोलचा आता नवीन दर १०२.४२ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात तब्बल २६ पैशांनी लिटरमागे वाढ करण्यात आली आहे. आता डिझेलचा प्रति लिटर दर ९२.०८ रुपये झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोल आता १०५.११ रुपये लिटर झाला आहे.

प्रमुख शहरातील अनुक्रम पेट्रोल, डिझेलचे प्रति लीटर दर / रूपये

दिल्ली – 95.56 – 86.47
मुंबई – 101.76 – 93.85
कोलकाता – 95.52 – 89.32
चेन्नई – 96.94 – 91.15
जयपुर – 102.14 – 95.37
बेंगळुरु – 98.75 – 91.67
नोएडा – 92.91 – 86.95
भोपाळ – 103.71 – 95.05
श्रीगंगा नगर – 106.64 – 99.50
रिवा – 105.93 – 97.11

हे देखील वाचा

4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

ट्विटर ला देखील फॉलो करा