पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ

मुंबई : वृत्तसंस्था

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या आहेत. डिझेलच्या दरात 14 पैसे तर पेट्रोलच्या दरात 13 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज डिझेल 73 रुपये 84 पैशांनी मिळत असून पेट्रोलसाठी 85 रुपये 45 पैसे मोजावे लागत आहेत.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07171474-a9e8-11e8-ad0a-e74512fef428′]

तर दिल्लीत डिझेलचा प्रतिलिटर दर 69.46 रुपयांवर पोहोचला असून तो आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. तर पेट्रोल 78 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सेल्स टॅक्स किंवा व्हॅट कमी असल्याने दिल्लीत इंधनाचे दर कमी आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण, यामुळे डिझेलने नवा विक्रमी दर गाठला आहे. सोबत पेट्रोलचे दरही विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्स अॅपला चार आठवड्यांची मुदत

डॉलरच्या तुलनेत रुपयात सर्वाधिक घसरण झाल्यानंतर 16 ऑगस्टपासूनच डिझेल-पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मागील दहा दिवसात मुंबईत डिझेलच्या किमतीत 49 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल प्रतिलिटर 57 पैशांनी महागलं आहे.

इंधन कंपन्या देशातील ग्राहकांना महागडे इंधन खरेदी करण्यास भाग पाडत असताना सरकारी रिफायनरी कंपन्या अमेरिका, इंग्लंड, इराक, इस्त्रायल, ऑस्ट्रेलिया, हाँगकॉंग आणि युएईसारख्या देशात पेट्रोल प्रति लिटर ३४ तर डिझेल ३७ रूपये दराने विकत असल्याचे वृत्त आहे.

शिवरायांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमचा ‘त्या’ मिरवणूकीत सहभाग