Petrol-Diesel : जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत असताना आज लागोपाठ दुसर्‍या दिवशी किमती वाढलेल्या नाहीत. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. यामुळे आता राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी 80.43 रुपयेच मोजावे लागत आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी 80.53 रुपये खर्च करावे लागत आहेत. दिल्लीशिवाय देशातील अन्य शहरांमध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई              87.19 – 78.83
पुणे                86.86 – 77.32
ठाणे              86.75 – 77.19
अहमदनगर    87.84 – 78.28
औरंगाबाद     87.51 – 77.95
धुळे              87.35 – 77.81
कोल्हापूर      87.39 – 77.86
नाशिक         87.60 – 78.03
रायगड          87.50 – 77.91

केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कर वाढवल्याने सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. दिल्ली तर डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त झाल्याने देशात हा संतापाचा आणि चर्चेचा मुद्दा झाला आहे.

जाणून घ्या किती आहे उत्पादन शुक्ल व अन्य कर
पेट्रोलच्या मुळ किमतीत कर 50.69 रुपये प्रति लीटर म्हणजेच 64 टक्के आहे. यामध्ये 32.98 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.71 रुपये स्थानिक विक्रीकर किंवा वॅट आहे. तर डिझेलच्या मुळ किमतीत कर सुमारे 63 टक्के म्हणजेच प्रति लीटर 49.43 रुपये आहे. यामध्ये 31.83 रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 17.60 रुपये वॅट आहे.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता