सर्वसामान्यांना दिलासा ! पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र थांबले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुरू असलेली दरवाढ आता थांबली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यापूर्वी सोमवारी पेट्रोल 5 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 13 पैसे प्रति लीटरने महागले होते. मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचे दर 87.19 रुपयांवर स्थिर आहेत. एक लीटर डिझेलसाठी 78.83 रुपये खर्च करावे लागतील.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 87.19 – 78.83
पुणे 87.27 – 77.71
ठाणे 87.24 – 77.88
अहमदनगर 86.95 – 77.42
औरंगाबाद 87.99 – 78.41
धुळे 87.14 – 77.61
कोल्हापूर 87.44 – 77.91
नाशिक 87.26 – 77.71
रायगड 87.05 – 77.48

अर्थव्यवस्थे समोर आव्हान
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या स्थितीत आव्हानांना तोंड देत आहे. कोरोना जागतिक महामारीमुळे तेल आणि गॅस इंडस्ट्रीसुद्धा मागणी आणि पूर्ततेच्या विचित्र संकटातून जात आहे. लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सुमारे 70 टक्के घसरण झाली. जूनमध्ये आर्थिक हालचाल वाढण्याबारोबर हळुहळु मागणी वाढत आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वसामान्य ग्राहकांवर परिणाम झालेला नाही. त्यांनी असेही म्हटले की, जेव्हा कुटुंबावर संकट येते तेव्हा व्यक्ती मोठ्या धैर्याने आर्थिक साधनांची व्यवस्था करते. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सुद्धा तयारी केली जाते, इंधनाच्या वाढलेल्या किमतीकडे अशा दृष्टीकानातून पाहिले गेले पाहिजे.