Petrol & Diesel Price Today | मुंबईत 101 रूपये पेट्रोल तर डिझेल दरात ही ‘उच्चांक’, जाणून घ्या आजचे पुण्यातील दर

मुंबई/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून इंधनदरवाढ सुरु झाली आहे. दररोज वाढत असणाऱ्या दरांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे ( Petrol & Diesel Price Today ) दर रोज नवे उच्चांक गाठत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढवले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून सोमवारी सोमवारी पेट्रोल २८ पैसे, तर डिझेल २७ पैशांनी महाग झाले आहे. त्यानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लीटर ९५.३१ रुपये, तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर १०१.५२ रुपये झाला आहे. दरम्यान, डिझेलच्या दरानेही नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या दरवाढी ( Petrol & Diesel Price Today ) नंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा दर ९३.९८ रुपये झाला आहे.

खाद्य तेलाचे वाढते दर. त्यातच इंधनाची दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. सोमवारी झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०१.५२ रुपये झाला आहे.
तर, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लीटर ९५.३१ रुपये झाला आहे.
चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.७१ रुपये आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये झाला आहे.
तत्पूर्वी रविवारी देशभरात पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी महागले होते.

मुंबईत डिझेल दर उच्चांकी पातळीवर !

डिझेल दरवाढीनेही उच्चांकी गाठली असून मुंबईत एक लीटर डिझेलचा दर ९३.९८ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा दर ८६.२२ रुपये चेन्नईत ९०.९२ रुपये प्रति लीटर तर,
कोलकाता येथे डिझेलचा दर ८९.०७ रुपये झाला आहे.
भोपाळमध्ये पेट्रोल १०३.१७ रुपये असून डिझेल ९४.५० रुपये झाले आहे.
गत महिन्यात तब्बल १८ वेळा दरवाढ झाली असून पेट्रोल ४.३६ रुपये आणि डिझेल ४.९३ रुपयांनी महागले आहे.
त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि लेह या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत.

आजचे पुण्यातील दर

तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात सुरु केलेली भाववाढ सातत्याने कायम ठेवली आहे.
जून महिन्यातील पहिल्या ७ दिवसात तिसर्‍यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे २७ पैशांनी वाढ झाली आहे.
पुण्यात पेट्रोलचा आजचा दर हा १०१.१८ रुपये लिटर असणार आहे.
डिझेलच्या दरात लिटरमार्ग २८ पैशांनी वाढ झाली आहे.
आज डिझेलचा दर ९१.२८ रुपये लिटर असणार आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही २७ पैशांनी वाढ झाली आहे.
पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर १०४.८७ रुपये लिटर झाला आहे.

E-Pass बाबत ‘संभ्रम’ आणि ‘गोंधळ’ ! पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच; आज येणार अधिक स्पष्टता – पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला ‘प्रिन्स हॅरी’, पत्नी ‘मेगन मर्केल’ने मुलीला दिला जन्म, ‘लिली डायना’ ठेवले नाव