पेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार गाड्या, 60-62 रुपये असेल एक लीटरची किंमत

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने (Petrol Diesel Price) देशभरातील लोक त्रस्त झाले आहेत. यावर सरकार पुढील 8 ते 10 दिवसात मोठा निर्णय घेऊ शकते. सरकार ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. गडकरी म्हणाले, या पावलाने शेतकर्‍यांना मदत होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गडकरी यांनी रोटरी जिल्हा संमेलन 2020-21 (Rotary District Conference 2020-21) ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना म्हटले की, पर्यायी इंधन इथेनॉल (Ethanol) ची किंमत 60-62 रुपये प्रति लीटर आहे. तर देशाच्या अनेक भागात पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहे. यासाठी इथेनॉलच्या वापराने भारतीयांची 30-35 रुपये प्रति लीटरची बचत होईल.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनचा असेल पर्याय

त्यांनी म्हटले, मी परिवहन मंत्री आहे, मी उद्योगासाठी एक आदेश जारी करणार आहे की, केवळ पेट्रोल इंजिनच नसतील, फ्लेक्स-फ्यूएल इंजिनसुद्धा असतील, जिथे लोकांकडे पर्याय असेल की, ते 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील. केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले, मी 8 ते 10 दिवसात निर्णय घेईन आणि आम्ही यास (फ्लेक्स-फ्यूएल इंजिन) ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य करू.

या देशांमध्ये होत आहे फ्लेक्स-फ्यूएल इंजिनचा वापर

त्यांनी म्हटले की, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स-फ्यूएल इंजिनचे उत्पादन करत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल (Bio-ethanol) वापराचा पर्याय उपलब्ध करून देणार आहोत.

पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु

सरकारने पुढील दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग (ethanol-blending) चे ध्येय ठेवले आहे, ज्यामुळे देशाला महागड्या तेलावरील अवलंबत्व कमी करण्यास मदत होईल. यापूर्वी सरकारने 2025 पर्यंत ते साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले होते जे आता आणखी जवळ आणून 2023 केले आहे.

Amarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे लागोपाठ दुसर्‍यांदा झाली रद्द, भक्तांसाठी ऑनलाइन होणार आरती

गडकरी म्हणाले, सध्या पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते, जे 2014 मध्ये 1-1.5 टक्के होते.
इथेनॉल पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे आणि ते आयातीला पर्याय आहे. खर्च प्रभावी, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी आहे.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य करणे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारे आहे कारण आपण एक कॉर्न सरप्लस, एक शुगर सरप्लस आणि एक गहू सरप्लस देश आहोत. आपल्याकडे ही सर्व खाद्यान्न ठेवण्यासाठी जागा नाही.

Bank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन् ग्राहकांत संभ्रम

इथेनॉल काय असते
इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळून गाड्यांसाठी इंधनाप्रमाणे वापरले जाते. इथेनॉलचे उत्पादन ऊसापासून होते.
ते पेट्रोलमध्ये मिसळून 35 टक्केपर्यंत कार्बन मोनोऑक्साईड कमी केला जाऊ शकतो.
इथेनॉल ब्लेंडिंगच्या पेट्रोलने सामान्य माणसांना सुद्धा मोठा फायदा होईल.
इथेनॉलने चालणार्‍या गाड्या पेट्रोलच्या तुलनेत खुप कमी गरम होतील.
इथेनॉलमधील अल्कोहोल लवकर उडते, ज्यामुळे इंजिन लवकर गरम होत नाही.

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : petrol diesel price nitin gadkari says decision over flex fuel engines in 8 10 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update