पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र आता परिस्थिती सामान्य झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होताना दिसून येत आहे. आज पेट्रोल 5 पैसे आणि डिझेल 5 ते 6 पैश्यांनी स्वस्त झाले आहे.

कोणत्या शहरात किती दर : जाणून घ्या –

आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73. 54 रुपये प्रति लिटर झाले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत डिझेलचे दर देखील कमी झाले आहेत. पाच पैश्यांनी कमी होऊन दिल्लीत आज डिझेलचा दर 66.75 रुपये प्रतिलिटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 79.15 रुपये लिटर झाले आहेत. मुंबईत आज डिझेलचा दर 70.03 रुपये प्रतिलिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 76.38 रुपये लिटर झाले आहेत. तर डिझेलचा दर 70.51 रुपये प्रति लीटर झाला आहे.

तर कोलकात्यात पेट्रोलचे दर 76.18 रुपये लिटर झाले आहेत. तर डिझेलचा दर 69.11 रुपये प्रति लीटर झाला आहे.

सकाळी सहा वाजता बदलते किंमत –
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता दररोज बदल होत असून नवीन दर रोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. यामध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश करून भाववाढ केली जाते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like