खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेल विपणन कंपन्यांनी सलग तीन दिवसांच्या कपातीनंतर गुरुवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल १५ पैशांनी तर कोलकातामध्ये १६ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले आहे. दिल्ली, कोलकाता येथे डिझेल १४ पैशांनी आणि मुंबई आणि चेन्नईमध्ये १५ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली येथे पेट्रोल ७५.५५ रुपये, कोलकाता- ७८. १४ रुपये, मुंबई- ८१.१४ रुपये, आणि चेन्नई येथे ७८.४९ रुपये आहेत. त्याचबरोबर या चार शहरांत डिझेलचे दरही अनुक्रमे ६८.९२ रुपये, ७१.२९ रुपये, ७२.२७ रुपये आणि ७२.८७ रुपये आहेत.

दरम्यान, IOC, BPCL आणि HPCL या सर्व तेल विपणन कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढतच आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत लागू होईल. उत्पादन शुल्क, सर्वकाही डीलर कमिशन जोडल्यानंतर त्यांची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

SMS द्वारे जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर :
आपण SMS द्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑइल आयओसी ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ क्रमांकावर पाठवू शकता. तसेच एचपीसीएल ग्राहक HPPRICE लिहत ९२२२२०११२२ क्रमांकावर पाठवू शकता. बीपीसीएल ग्राहक RSP लिहत ९२२३११२२२२ क्रमांकावर पाठवू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/