खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी आरामको कंपनीमध्ये आग लागल्यामुळे इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली होती. आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे आणि हळूहळू दर देखील कमी देखील होत आहेत. त्याचप्रमाणे क्रूड ऑइलच्या दरात देखील घसरण पहायला मिळाली आहे. त्यामुळे कालच्या मानाने आज पेट्रोलमध्ये 12 पैशानी आणि डिझेलमध्ये 12 -13 पैशांची घसरण झाली आहे.

आज कोणत्या शहरात काय सुरु आहेत दर –

आज सोमवारी 07 ऑक्टोबर रोजी अनेक शहरात इंधनाचे दर बदलले पाहायला मिळाले. एक नजर टाकुयात शहरातील बदललेल्या आकडेवारीवर

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 13 पैशांनी घसरून 76.40 रुपये प्रति लिटर तर डिझेल 12 पैशांनी कमी होऊन 69.27 रुपये प्रति लीटर दरावर पोहचले आहे.

कोलकत्त्यामध्ये पेट्रोलचे दर 13 पैशांनी घसरून 73.76 रुपये प्रति लिटर तर डिझेल 12 पैशांनी कमी होऊन 66.91 रुपये प्रति लीटर दरावर पोहचले आहे.

चैन्नईमध्ये पेट्रोलचे दर 13 पैशांनी घसरून 76.61 रुपये प्रति लिटर तर डिझेल 13 पैशांनी कमी होऊन 70.68 रुपये प्रति लीटर दरावर पोहचले आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 13 पैशांनी घसरून 73.76 रुपये प्रति लिटर तर डिझेल 12 पैशांनी कमी होऊन 66.91 रुपये प्रति लीटर दरावर पोहचले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येक दिवशी बदल होत आहेत आणि सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू होत आहेत.

Visit : Policenama.com