खुशखबर ! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. रविवारी राजधानी दिल्लीसह देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. तेल वितरण कंपन्यांनी देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 12 ते 16 पैशांनी कमी केले आहेत.

राजधानी दिल्लीत पेट्रोल आज 15 पैशांनी स्वस्त झाले असून प्रति लिटर 78.89 रूपये झाले आहे. डिझेलचे दर 12 पैशांनी कमी झाल्याने एक लिटर डिझेलची किंमत खाली 67.03 रुपयांवर आली आहे. कोलकात्यामध्ये आज पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त झाले असून 76.53 आणि डिझेल 12 पैशांनी स्वस्त झाले असून पेट्रोल प्रति लिटर 69.39 रुपये विकले गेले आहे.

मुंबईतही पेट्रोलची किंमत 15 पैशांनी घटली असून पेट्रोलचा दर 79.50 रुपये प्रती लिटर तर डिझेलमध्ये 12 पैशांची घट झाल्याने दर प्रति लिटर 70.27 झाला आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त झाले असून दर 76.74 रुपये प्रति लीटर झाला आहे तर डिझेल 13 पैसे स्वस्त झाल्याने प्रति लिटर 70.81 रुपये झाले आहे.

Visit : Policenama.com