Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price | मोदी सरकारपाठोपाठ (Modi Government) राज्य शासनाने (Maharashtra State Government) पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर (Tax) अर्थात व्हॅट कपात (VAT Tax Deduction) केल्याचे जाहीर केले. त्यानुसार राज्यातील विविध शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार यांची माहिती तातडीने जाहीरही झाली. त्यामुळे राज्य शासनाला किती महसुलावर पाणी सोडावे लागणार, हेही सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात आज सकाळी लोक पेट्रोल पंपावर गेले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, पेट्रोल पंपावर आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कालचेच कायम होते. कोणतीही दरकपात झाली नसल्याचे आढळून आले.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात कपात (Petrol Diesel Price) करुन नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे राज्य शासनाने व्हॅटमध्ये कपात करावी, अशी मागणी सुरु झाली होती. विरोधक भाजपने (BJP) तर टिकास्त्र सुरु केले होते. त्यामुळे राज्य शासनाने पेट्रोलवरील कर 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील कर 1 रुपया 44 पैशांनी कमी केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, व्हॅट (VAT) कमी केल्याचा जी आरच काल काढण्यात आला नाही.

त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. केंद्र सरकारने कमी केलेल्या दरानेच सोमवारी राज्यात पेट्रोल व डिझेलची विक्री करण्यात येत आहे. कदाचित आज राज्य शासनाकडून जी.आर काढल्यानंतर उद्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होऊ शकेल. किंवा 1 जूनपासून हे दर कमी होऊ शकतील. राज्य शासन ही कपात कधीपासून लागू करेल, त्यावर हे अवलंबून आहे.

आज पुणे शहरातील दर –

– पेट्रोल – 110.87 रुपये लिटर
– पॉवर पेट्रोल – 115.63 रुपये लिटर
– डिझेल – 95.36 रुपये लिटर
– सीएनजी – 80 रुपये किलो

Web Title : Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर