Petrol-Diesel Price | एप्रिलनंतर पेट्रोलच्या किमती 39 वेळा आणि डिझेलचे रेट 36 वेळा वाढले; जाणून घ्या राज्यासह देशातील प्रमुख शहरांमधील आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  यावर्षी एप्रिलनंतर आतापर्यंत पेट्रोल (Petrol) च्या किंमती 39 वेळा वाढल्या आहेत. तर, डिझेलचे रेट (Diesel Price) 36 वेळा वाढले (Petrol-Diesel Price) आहेत. मोदी सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. या दरम्यान, पेट्रोलच्या किमतीत एकवेळा आणि डिझेलमध्ये दोनवेळा कपात (Petrol-Diesel Price ) झाली. पेट्रोलच्या भावात 64 वेळा आणि डिझेलमध्ये 66 वेळा कोणताही बदल झाला नाही.

घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरची किंमत एक जुलैपर्यंत एकदा वाढली आहे आणि एकदा कमी झाली आहे. Minister of State for Petroleum and Natural Gas रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

विरोधकांनी विचारला होता प्रश्न

विरोधीपक्षाने मंत्रालयाला प्रश्न विचारला होता की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री कृपया सांगतील का? देशात कच्च्या तेलाची सध्याची किंमत आणि देशात मागील एक वर्षादरम्यान पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये कितीवेळा वाढ झाली आहे. Petrol-Dieselच्या किंमतीमध्ये अभूतपूर्व वाढीमुळे नागरिकांनी एकुण पेट्रोल/डिझेल/एलपीजीवर खर्च केलेल्या अतिरिक्त रक्कमेचा जीडीपीच्या संदर्भात ग्राहकांवर कोणता प्रभाव पडला आहे.

मंत्रालयानुसार, भारतात एक बॅरल क्रूड ऑईलची किंमत जुलैमध्ये 74.36 डॉलर प्रति बॅरल होती. जूनमध्ये ती 71.98 बॅरल प्रति डॉलर, मेमध्ये 66.95 डॉलर प्रति बॅरल आणि एप्रिलमध्ये 63.40 डॉलर प्रति बॅरल होती.

सर्वात जास्त टॅक्स मणिपुर आणि राजस्थानमध्ये

राज्यांच्या हिशेबाने पेट्रोलवर सर्वात जास्त टॅक्स मणिपुर (36.50 per cent VAT (value added tax) वसूल करत आहे. तर, राजस्थान 36% VAT, Rs 1,500/KL road development cess वसूल करत आहे. तेलंगना 35.20 टक्के VAT तर कर्नाटक 35 टक्के सेल्स टॅक्स वसूल करत आहे.

 

पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price on 20 July 2021)

महाराष्ट्र

मुंबई – पेट्रोल 107.83 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लीटर

पुणे – पेट्रोल 107.58 रुपये आणि डिझेल 95.73 रुपये प्रति लीटर

नागपुर – पेट्रोल 107.67 रुपये आणि डिझेल 95.85 रुपये प्रति लीटर

नाशिक – पेट्रोल 107.61 रुपये आणि डिझेल 95.76 रुपये प्रति लीटर

कोल्हापूर – पेट्रोल 107.97 रुपये आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर

औरंगाबाद – पेट्रोल 108.49 रुपये आणि डिझेल 96.61 रुपये प्रति लीटर

देश

दिल्ली – पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर

चेन्नई – पेट्रोल 102.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

कोलकाता – पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर

बेंगळुरु – पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर

लखनऊ -पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर

पाटणा – पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.81 रुपये प्रति लीटर

भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर

जयपुर – पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर

गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

Web Title : Petrol-Diesel Price | petrol diesel price after april the price of petrol increased by 39 times and the rate of diesel by 36 times

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Lonavala News | लोणावळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; दोन दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड

Lung Fibrosis | कोरोना व्हायरसच्या हल्ल्याने खराब झालेली फुफ्फुसे 3 महिन्यात होताहेत ठिक : स्टडी

786 Serial Number | जर तुमच्याकडे असेल 10 रुपयांची 786 नंबरची ही नोट? तर घरबसल्या कमावू शकता 5 लाख रुपये- जाणून घ्या कसे