Petrol-Diesel Price | खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून मिळू शकतो दिलासा, सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Petrol-Diesel Price) पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Hike) च्या वाढलेल्या किमतीने देशभरातील जनता हैराण झाली आहे. तसेच यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढल्याने जनतेमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, आता या महागाईतून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांचे एक पॅनल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) वर सिंगल नॅशनल रेट अंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवर टॅक्स लावण्याबाबत विचार करणार आहे.
याबाबत माहिती असलेल्या सूत्रांनुसार, कंज्यूमर प्राईस आणि सरकारी महसूलातील संभाव्य बदलांसाठी महत्वाचे पाऊल उचलले जाऊ शकते.

शुक्रवारी लखनऊमध्ये होणार्‍या 45व्या जीएसटी कौन्सिल (GST Council) च्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखालील पॅनल यावर विचार करेल.

कसा होतो जीएसटी सिस्टमध्ये बदल?

जीएसटी सिस्टममध्ये जर कोणताही बदल करायचा असेल त्यामध्ये पॅनलच्या तीन-चथुर्तांश संमतीची गरज असते.
यामध्ये सर्व राज्य आणि प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

मात्र, यापैकी काहींनी इंधनाचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास विरोध केला आहे.
कारण त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे केंद्र सरकारला एक प्रमुख महसूल जमवणारे टूल सोपवावे लागेल.

 

Web Title : Petrol-Diesel Price | petrol diesel price latest news government to consider bringing petrol diesel under

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली तब्बल 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR, ‘रिपोर्टर’सह दोघांना अटक

Gold Price Update | लागोपाठ चौथ्या दिवशी स्वस्त झाले सोने, आता 27532 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम; जाणून घ्या नवीन दर

KBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं केला पहिल्या प्रेमाचा उल्लेख (व्हिडिओ)