Petrol Diesel Price | सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! लवकरच स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल, 7 आठवड्याच्या खालच्या स्तरावर आले कच्च्या तेलाचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील स्थानिक बाजारांमध्ये सुद्धा पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. ‘CNBC’ चा एक रिपोर्ट सांगतो की, जागतिक बाजारात ब्रेंट आणि यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट (WTI) च्या दरात मोठी घसरण (Petrol Diesel Price) दिसून आली आहे.
या दोन्ही बेंचमार्कमध्ये सध्या ऑक्टोबरनंतर सर्वात मोठी घसरण नोंदली गेली आहे.
यानुसार जगाच्या इतर बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात.
भारतात काहीशी अशीच स्थिती पहायला मिळू शकते.
मात्र, केंद्र सरकारने कच्च्या तेलाचे दर कमी होऊन सुद्धा ते आहे तेवढेच ठेवले तर मात्र सामान्य लोकांना याचा फायदा होणार नाही.
कारण अशाच प्रकारे कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी केले नव्हते.
‘CNBC’ ने ‘रॉयटर्स’च्या एका रिपोर्टच्या संदर्भाने लिहिले आहे की, ब्रेंट 57 सेंट किंवा 0.72% घसरून 78.32 डॉलर प्रति बॅरल झाले आहे.
यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) क्रूड फ्यूचर्स 39 सेंट किंवा 0.51% खाली घसरून 75.55 डॉलर प्रति बॅरलवर गेले आहे.
WTI आणि ब्रेंटची किंमत 1 ऑक्टोबरच्या नंतर सर्वात खालच्या स्तरावर पोहचली. शुक्रवारी जवळपास 3 टक्के घसरण दिसून आली.
7 आठवड्यात सर्वात मोठी घसरण
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 7 आठवड्याच्या सर्वात खालच्या स्तरावर आहेत. तेल कंपन्यांनी अलिकडेच पुरवठ्यात वाढ केली आहे.
दुसरीकडे जपानने म्हटले आहे की, कोविड महामारीमुळे युरोपमध्ये निर्माण झालेली गॅसची टंचाई दूर करण्यासाठी ते आपल्या गॅसच्या खाणी उघडणार आहेत.
या दोन्ही कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती घसरताना दिसत आहेत.
जर कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला आणि जपानने गॅसच्या खाणी उघडल्या तर आगामी काळात संपूर्ण जगात याचा चांगला परिणाम दिसेल.
अमेरिकेने जपानला विनंती केली आहे की, तेल आणि गॅसच्या वाढत्या किंमती पाहता इमर्जन्सी साठा खुला करावा जेणेकरून वेगाने वाढणार्या किमतीवर अंकुश लावता येऊ शकतो.
अमेरिकेच्या या मागणीनंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी संकेत दिले आहेत की, तेल आणि गॅसच्या साठ्यातून पुरवठा वाढवला जाऊ शकतो.
मात्र, संपूर्ण जगाला ही चिंता सतावत आहे की, कोविडची पुढील लाट तेलाची (Petrol Diesel Price) मागणी पुन्हा प्रभावित करू शकते.
कारण जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे.
आयर्लंड आणि नेदरलँडमध्ये कर्मचार्यांना घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
अमेरिकेने जगातील मोठ्या आर्थिक महाशक्तींसोबत मीटिंग घेतली आणि सांगितले की, तेलाचा इमर्जन्सी पुरवठा सुरू करण्यात यावा जेणेकरून टंचाई संपवता येईल.
Web Title : Petrol Diesel Price | petrol diesel price may down after crude oil hits 7 week lows on supply release expectations
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Urfi Javed | उर्फीचा एअरपोर्ट लुक बघून चाहते ‘हैराण’, फोटो पाहून व्हाल थक्क !
Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात एकाचा खून, दुसरा जखमी; प्रचंड खळबळ