Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Petrol Diesel Price | केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty on Petrol) 5 रुपये आणि डिझेलवर (Excise Duty on Diesel) 10 रुपये प्रति लीटरची कपात करून मोठा दिलासा दिला आहे. तसचे, काही राज्यांनी दोन्ही इंधनावरील वॅट कमी (VAT Cut) करून सामान्य लोकांना आणखी दिलासा दिला आहे. यानंतर सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) खुपच जास्त आहेत.

 

अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही पेट्रोलचा किरकोळ दर 100 रुपये प्रति लीटरच्या वर आहे.
पेट्रोल-डिझेलच्या मोठ्या किमतीपासून (Petrol Diesel Price) दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) विशेष योजना आखली आहे.
यावर अंमलबजावणी झाल्यानंतर तुमच्या कारचे इंधन (Vehicle Fuel) केवळ 60 रुपये लीटरमध्ये मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. केंद्राच्या या योजनेबाबत जाणून घेवूयात…

 

पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडरचे वाढते दर आणि एकुणच महागाईमुळे देशभरात नाराजीचा सूर असून यामुळे मोदी सरकारवर टीकेचा भडीमार होत आहे.
यामुळे सरकारचा प्रयत्न आहे की, पेट्रोल-डिझेलवरील अवलंबत्व कमी केले जावे. यासाठी ईथेनॉल ब्लेंडिंग (ethanol blending) चे काम सुरू आहे.

 

आता सरकार देशात लवकरच फ्लेक्स इंधन (Flex Fuel) सादर करण्याच्या प्रयत्न करत आहे.
यामुळे सामान्य लोकांची महागड्या पेट्रोल-डिझेलपासून सूटका होईल आणि वाहनांसाठी इंधन 60 रुपये प्रति लीटरमध्ये मिळेल.

 

लवकरच अनिवार्य होईल हे विशेष इंधनाचे इंजिन

 

परिवहन मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी फ्लेक्स इंधनाचा मसुदा तयार केला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले होते की, सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे.

 

गडकरी यांनी म्हटले की, सरकार फ्लेक्स इंधन इंजिन (Flex Fuel Engine) पुढील काही महिन्यात अनिवार्य करणार आहे.
हा नियम प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी बनवला जाईल. सर्व ऑटो कंपन्यांना आदेश दिले जातील की, वाहनांमध्ये फ्लेक्स इंधन इंजिनचा वापर करा.

 

काय आहे फ्लेक्स इंधन आणि इंजिन?

 

फ्लेक्स इंधनाद्वारे तुम्ही तुमची कार ईथेनॉलने मिश्र इंधनाद्वारे चालवू शकता फ्लेक्स इंधन गॅसोलीन आणि मेथनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणाने बनवलेले पर्यायी इंधन आहे.
फ्लेक्स इंजिन मुळरूपात एक मानक पेट्रोल इंजिनच असते. यामध्ये काही अतिरिक्त कंपोनंट असतात, जे एकापेक्षा जास्त इंधनावर चालतात.
हे इंजिन इलेक्ट्रिकल वाहनाच्या तुलनेत कमी खर्चात तयार होते.

 

पेट्रोल पंपांवर मिळेल जैव इंधन

 

सरकार लवकरच फ्लेक्स इंधनाबाबत मार्गदर्शकतत्त्वांची घोषणा करू शकते.
कार उत्पादकांसाठी फ्लेक्स इंधन इंजिन बनवण्यासाठी बंधनकारक केले जाऊ शकते.
यास इलेक्ट्रिकल वाहनांच्या तुलनेत जास्त व्यवहारीक सुद्धा मानले जात आहे.
यामुळे सध्याच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलसह (Petrol Diesel Price) जैव इंधनसुद्धा मिळू लागेल.

 

बायो इथेनॉलचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत खुप कमी आहे. फ्लेक्स इंजिनची वाहने बायो इंधन इंजिनच्या वाहनांपेक्षा खुप वेगळी असतात.
बायो इंधन इंजिनमध्ये वेगवेगळ्या टाक्या असतात. तर, फ्लेक्स इंधन इंजिनमध्ये एकाच प्रकारच्या टाकीत अनेक प्रकारचे इंधन टाकू शकता.

 

Web Title : Petrol Diesel Price | petrol diesel price will drop down to rs 60 per liter as center has made a plan for flex fuel cars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Viral Infection Mumbai | साथीच्या आजाराने डोकेदुखी वाढवली; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

Live-in Relationship | केवळ ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहिल्याने मिळत नाहीत वैवाहिक अधिकार, हायकोर्टाने म्हटले…

Bhiwandi Crime | कामाच्या वादातून सहकाऱ्यानेच चिरला 18 वर्षीय तरुणाचा गळा