Petrol Diesel Price Pune | पुण्यात डिझेलची ‘शंभरी’ पार ! 15 दिवसात साडेचार रुपयांची दरवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधनाच्या दरवाढीने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. या सलग काही दिवस सुरु असलेल्या दरवाढीने (Petrol Diesel Price Pune) पुण्यात डिझेलने शंभरी पार केली आहे. आज डिझेलचा दर 100.08 रुपये लिटर झाला आहे.

 

तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे 34 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर 110.92 रुपये झाला आहे.

 

डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 36 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात आज डिझेलचा दर 100.08 रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोल आज लिटरमागे 33 पैशांनी महागले. पॉवर पेट्रोलचा दर आज 114.60 रुपये लिटरवर गेला आहे.

 

गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
गेल्या 15 दिवसात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 3.67 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, डिझेल प्रति लिटर 4.51 रुपये महागले आहे.

 

Web Title :- diesel price in pune breaches rs 100 mark petrol sells for rs 110.92

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा