Petrol Diesel Price Pune | डिझेलच्या दराची शतकाकडे वाटचाल ! सलग सहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भाववाढ केली आहे. महाराष्ट्रात बंद सुरु असला तरी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ बंद झालेली नाही. त्यात डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल ३७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात आतापर्यंत ३२ पैशांनी वाढ होत होती. (Petrol Diesel Price Pune)

सोमवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे २९ पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर १०९.९१ रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात प्रति लिटर सर्वाधिक ३७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर ९९ रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोलही लिटरमागे २९ पैशांनी महागले आहे़ पॉवर पेट्रोलचा दर आता ११३.५९ रुपये लिटर झाला आहे. ही दरवाढ कधी थांबणार याची जनता आतूरतेने वाट पहात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने मध्यमवर्गीय, गरीबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (Petrol Diesel Price Pune)

हे देखील वाचा

Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

Maharashtra Band | पुण्यात ‘सरकारी’ बंदला मध्य वस्तीत ‘उर्त्स्फुत’ प्रतिसाद ! उपनगरांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत, पीएमपी बसगाड्या, रिक्षा बंद

Aadhaar कार्डच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर लवकर अपडेट करा ‘हा’ नंबर, UIDAI ने सांगितली संपूर्ण प्रक्रिया; जाणून घ्या

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Petrol Diesel Price Pune | Diesel price on the way to a century! Gasoline, diesel prices rise for sixth day in a row; Find out today’s rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update