Advt.

Petrol Diesel Price Pune | इंधनाचा भडका सलग तिसर्‍या दिवशी कायमच; महिन्याभरात पेट्रोलमध्ये 6.79 रुपयांची वाढ

पुणे : Petrol Diesel Price Pune | पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भडका दररोज सुरुच असून आज सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिला आहे.तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे पुण्यातील दर ११३.९४ रुपये लिटर इतका झाला (Petrol Diesel Price Pune) आहे.

डिझेलच्या दरातही लिटरमागे ३७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे पुण्यातील दर १०३.३५ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलमध्ये आज ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११७.६२ रुपये लिटर झाला आहे.

यापूर्वी तेल कंपन्यांनी मे, जून महिन्यात सातत्याने दरवाढ केली होती. त्यावेळी दररोज केल्या जाणार्‍या दरवाढीपेक्षा ऑक्टोबर महिन्यात झालेली दरवाढ मोठी ठरली आहे.

ऑक्टोबर महिन्यात आजअखेर पेट्रोलच्या दरात लिटरमध्ये ६.७९ रुपये, डिझेलमध्ये ७.७८ रुपये आणि पॉवर पेट्रोलमध्ये ६.७० रुपये वाढ झाली आहे.

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास त्यातून येतो’ – शिवसेनेचा हल्लाबोल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Petrol Diesel Price Pune Today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update