Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : Petrol Diesel Price Pune | घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न करता सामान्य गृहिणींना दिलासा देत असतानाच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भाववाढ कायम ठेवली आहे. आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Pune) करण्यात आली आहे.
पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११४.९५ रुपये लिटर इतका झाला आहे. डिझेलमध्ये आतापर्यंची एका दिवसातील सर्वाधिक ३९ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर १०४.४६ रुपये लिटर इतका आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३६ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११८.६५ रुपये लिटर इतका झाला आहे.
आतापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मात्र, या ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेली दरवाढ ही आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलच्या दरात ७.५० रुपये लिटर, डिझेलच्या दरात ८.५६ रुपये लिटर आणि पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.५० रुपये वाढ झाली आहे.
LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’