Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात ‘कपात’; जाणून घ्या पुण्यातील दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. डिझेलवरील १० रुपये तर पेट्रोलवरील ५ रुपये कर कपात करण्यात आली. त्याची अंमलबजावणी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price Pune)
पुण्यात पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ५.८३ रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात आज पेट्रोलचा दर १०९.५० रुपये इतका झाला आहे.
डिझेलच्या दरात प्रति लिटर ११.९६ रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे पुण्यात डिझेलचा दर ९२.५० रुपये लिटर झाले आहे.
पॉवर पेट्रोल प्रति लिटर ६.१२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११३.५० रुपये लिटर झाला आहे.
–
डिझेलच्या दरात आतापर्यंतच्या काळातील ही पहिलीच सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी डिझेलचा दर १३ जून रोजी ९२.६१ रुपये लिटर होता. त्या पातळीवर आज डिझेलचा दर आला आहे.
पेट्रोलचे आजचे दर हे १० ऑक्टोबरच्या पातळीवर आले आहेत. १० ऑक्टोबरला पेट्रोलचा दर प्रति लिटर १०९.६२ रुपये होता.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना दिलासा मिळाला आहे.
Web Title :- Petrol Diesel Price Pune | Petrol Diesel Price Pune Today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’
COVAXIN च्या आपत्कालीन वापराला अखेर WHO ने दिली मंजूरी, मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होते प्रकरण