Petrol Diesel Price | 12 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतं पेट्रोल-डिझेल ! अवघड आहेत पुढील 11 दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol Diesel Price | उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या चार महिन्यांपासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र, आता पुढील 11 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 रुपयांनी वाढ होऊ शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे. (Petrol Diesel Price)

 

काय आहे अहवालात :
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालानुसार, किरकोळ विक्रेत्यांना खर्च वसूल करण्यासाठी 16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 12 रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे. तेल कंपन्यांचे मार्जिन जोडल्यास प्रति लिटर 15.1 रुपयांची वाढ आवश्यक आहे.

 

ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात संपतील. त्यानंतर दररोज इंधनाचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे. (Petrol Diesel Price)

 

अहवालानुसार, 3 मार्च 2022 रोजी वाहन इंधनाचे निव्वळ विपणन मार्जिन 4.92 रुपये प्रति लिटर होते, जे शून्यापेक्षा कमी होते.
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आतापर्यंत ते 1.61 रुपये प्रति लिटर आहे.
मात्र, इंधनाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर, निव्वळ मार्जिन 16 मार्च रोजी मायनस 10.1 रुपये
प्रति लिटर आणि 1 एप्रिल रोजी 12.6 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकते.

कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकावर
पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस सेल (PPAC) नुसार,
3 मार्च रोजी भारताने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 117.39 वर पोहोचली. ही इंधनाची किंमत 2012 नंतरची सर्वोच्च आहे.

 

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्यावर प्रतिबंध लावला होता, तेव्हा कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 81.5 इतकी होती.
देशांतर्गत इंधनाच्या किमतींवर थेट आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींचा परिणाम होतो कारण भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो.

 

 

Web Title :- Petrol Diesel Price | rs 12 hike in petrol diesel price needed to break even icici securities

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Heart Attack | पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका महिलांपेक्षा जास्त का? हैराण करणारे आहे कारण; जाणून घ्या

 

Phone Tapping Case | ‘संजय राऊत आणि खडसेंचा फोन टॅप झाल्याचं महाराष्ट्राच्या समोर आलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी’ – अमोल मिटकरी

 

HSC Board Exam | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! इंग्रजीच्या पेपरमधील ‘हा’ प्रश्न चुकीचा सोडवला असेल तरीही मिळणार गुण