US – इराणच्या ‘टेन्शन’मध्ये भारतात ‘महाग’ झालं पेट्रोल, ‘तणाव’ आणखी वाढल्यास 90 रूपये प्रतिलिटर होईल ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे घरगुती पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढताना दिसत आहे. शनिवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमती पुन्हा एकदा 81 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेल्या आहेत. देशातील चार मोठे महानगर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात डिझेल्या किंमती 70 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेल्या आहेत. कमोडिटी एक्सपर्टचं म्हणणं आहे की, आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 10 महिन्यांच्या किंमतीत सर्वात टॉपला आहे. शुक्रवारी भारतीय रुपयात मोठी घसरण पहायला मिळाली. यामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आता काय होणार ?
एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांचं म्हणणं आहे की, जर इराणनं अमेरिकेवर प्रत्युत्तर देत कारवाई केली तर या तिमाहीत कच्च्या तेलाच्या किंमती 75 ते 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत 75 पर्यंत घसरू शकतो. असं झाल्यास पेट्रोलच्या किंमती पुन्हा एकदा 90 रुपये प्रतिलिटर होऊ शकतात.

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटींग कंपनी IOCच्या वेबासईटवरील नव्या रेट्सनुसार, देशातील चार प्रमुख महानगर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

1) दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर वाढून 75.45 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. डिझेलच्या दरात वाढ होऊन डिझेल 68.40 रुपये प्रतिलिटर झालं आहे. एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचे दर 78.25 रुपये प्रतिलिटर आहेत.

2) मुंबईत पेट्रोलचे दर वाढून 81.04 रुपये झाले आहेत. डिझेलचे दर वाढून 71.72 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचे दर 83.79 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

3) चेन्नई-
पेट्रोल- 78.39 रुपये प्रतिलिटर
डिझेल- 72.28 रुपये प्रतिलिटर
एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल- 81.33 रुपये प्रतिलिटर

4) कोलकाता-

पेट्रोल- 78.04 रुपये प्रतिलिटर
डिझेल- 70.76 रुपये प्रतिलिटर
एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल- 81.57 रुपये प्रतिलिटर

5) नोएडा-

पेट्रोल- 76.60 रुपये प्रतिलिटर
डिझेल- 68.67 रुपये प्रतिलिटर
एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल- 79.10 रुपये प्रतिलिटर

6) गुरुग्राम-

पेट्रोल- 74.80 रुपये प्रतिलिटर
डिझेल-67.32 रुपये प्रतिलिटर
एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल-77.55 रुपये प्रतिलिटर

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/