‘या’ कारणामुळं 37 दिवसात 2 रूपयांनी स्वस्त झालं पेट्रोल, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये देखील मागील 1 ऑक्टोबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत जवळपास दोन रुपयांची कपात झाली आहे. त्यानंतर आता पुढील 15 दिवसांत यामध्ये आणखी कपात होण्याची आशा आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत चालल्याने इंधन दरात हि कपात होत आहे.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आज पेट्रोलच्या दरांमध्ये कोणतीही कपात झाली नसून राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 72.60 रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर डिझेलचा भाव 65.75 रुपये प्रतिलिटर इतका आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे पेट्रोलियम कंपन्या ठरवत असून यामध्ये HPCL, BPCL आणि IOC या तेलउत्पादक कंपन्या हे दर ठरवत असतात.

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर हे 72.60 रुपये प्रतिलिटर असून मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 78.28 रुपये लिटर आहेत.चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 75.32 रुपये लिटर आहेत.कोलकात्यात पेट्रोलचे दर 75.45 रुपये लिटर आहेत. तर डिझेलचे दर हे चारही महानगरात अनुक्रमे 65.75 रुपये, 68.96 रुपये, 68.16 रुपये आणि 69.50 रुपये प्रति लीटर इतके आहेत.

या तीन पद्धतीने जाणून घ्या घरबसल्या पेट्रोलचे दर

1) एसएमएस द्वारे तुमच्या भागातील दर मिळवा
तुमच्या भागातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही एसएमएसच्या मदतीने मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येतो. प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांना हि सुविधा पुरवत असते. विविध कंपन्यांच्या कोड क्रमांक टाकून तुम्ही मॅसेज केल्यास तुम्हाला याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. 92249 92249 या क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही हे दर जाणून घेऊ शकता.

(2) वेबसाइटच्या माध्यमातून
इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. https://associates.indianoil.co.in/PumpLocator या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

(3) अ‍ॅपच्या माध्यमातून
तुमच्या फोनमध्ये तुम्ही इंडियन ऑईलचे अ‍ॅप डाउनलोड करून त्यावरून सर्व दर जाणून घेऊ शकता. गूगल प्लेस्टोरवरून तुम्ही फ्यूल@आयओसी नावाचे अ‍ॅप डाउनलोड करून हि माहिती मिळवू शकता.

 

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके