दिलासादायक ! 4 दिवसानंतर आज पुन्हा स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज चार दिवसांनतर पुन्हा घट झाली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 22 पैशांनी कमी होऊन 90.56 रुपयांवर आले आहे. डिझेल सुद्धा प्रति लीटर 23 पैशांनी कमी होऊन 80.87 रुपये प्रति लीटर झाले आहे.

कच्च्या तेलाचा बाजार थोडा नरम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 64.79 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. मागील 15 दिवसात कच्च्या तेलाचे भाव 15 टक्केपेक्षा घसरले आहेत.

यापूर्वी तेल कंपन्यांनी मागील आठवड्यात गुरुवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली होती. बुधवारी सुमारे 24 दिवसानंतर तेल कंपन्यांनी दरात कपात केली होती. सध्या दिल्लीत पेट्रोल 39 पैसे आणि डिझेल 37 पैसे स्वस्त झाले आहे.

टॅक्स आहे जबरदस्त
पेट्रोल आणि डिझेल देशात विक्रमी किमतीला विकले जात आहे. कारण यावर खुपच जास्त टॅक्स केंद्र सरकारने लावला आहे. सरकारला सध्याच्या आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटीतून 3.49 लाख कोटी रुपये मिळतील. आर्थिक वर्ष 2020-21 चा बजेट अंदाज 2.49 लाख कोटी रुपयांपेक्षा 39.3 टक्के किंवा सुमारे 97,600 कोटी रुपये जास्त असेल. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्समधून मोदी सरकारला कोरोना काळ असूनही यावर्षी जबरदस्त कमाई होणार आहे.

हे आहे प्रमुख शहरातील दर
* मुंबईत पेट्रोल 96.98 रुपये, डिझेल 87.96 रुपये लीटर
* चेन्नईत पेट्रोल 92.58 रुपये आणि डिझेल 85.88 रुपये लीटर
* कोलकातामध्ये पेट्रोल 90.77 रुपये आणि डिझेल 83.75 रुपये लीटर.