Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसर्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत सलग तिसर्या दिवशी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 24 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर 107.71 रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Today)
पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली असून आता डिझेलचे दर शंभरीच्या दिशेन घोडदौड करु लागले आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर 31 पैशांची वाढ झाली आहे. पुणे शहरात डिझेलचा दर 96.19 रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर 24 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर 111.39 रुपये लिटर झाला आहे. 27 सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात सुरुवात झाली आहे़ तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोल तब्बल 88 पैशांनी तर डिझेल 1.19 रुपयांनी महागले आहे.
Web Title :- Petrol Diesel Price Today in pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Police | पुण्यात पोलीस भरती परिक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 2744 हजार जणांचा फौजफाटा तैनात
Pune Crime | सलूनमध्ये ‘दाढी’ करणं तरुणाला पडलं दोन लाखात, पुण्यातील धक्कादायक प्रकार