खुशखबर ! सणासुदीच्या काळात 1 रुपया प्रति लिटर पेक्षा जास्त ‘स्वस्त’ झालं पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरामध्ये सतत घट होत आहे. या महिन्यात पेट्रोलच्या किमतींमध्ये जवळ्पास १ रुपया ३४ पैश्यांची घट झाली आहे. इंडियन ऑईलकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, मुंबई,चेन्नई आणि कोलकात्यामध्ये पेट्रोलचे भाव सध्या स्थिर असून आज किमतींमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर हे प्रतिलिटर 74.61 इतके होते. तर 21 ऑक्टोबर रोजी ते 73.27 रुपयांवर आले.

त्याचबरोबर डिझेलच्या दरात देखील घट झाली असून डिझेल 67.49 रुपये प्रतिलिटरवरून 66.17 रुपये प्रति लीटर झाले आहेत. यानंतर आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73.27 रुपये लिटर झाले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत डिझेलचे देखील भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दिल्लीत आज डिझेलचा दर 66.31 रुपये प्रतिलिटर झालं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 75.92 रुपये लिटर झाले आहेत. मुंबईत आज डिझेलचा दर 68.67 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 76.09 रुपये लिटर झाले आहेत.

एसएमएस द्वारे तुमच्या भागातील दर मिळवा
तुमच्या भागातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही एसएमएसच्या मदतीने मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येतो. प्रत्येक मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांना हि सुविधा पुरवत असते. विविध कंपन्यांच्या कोड क्रमांक टाकून तुम्ही मॅसेज केल्यास तुम्हाला याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळी सहा वाजता बदलते किंमत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता दररोज बदल होत असून नवीन दर रोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. यामध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश करून भाववाढ केली जाते.

Visit  :Policenama.com