Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Today | गेल्या वर्षी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात (Global Market) तेलाच्या किमती वाढल्या. पण तरीही भारतात इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. नंतर तेलाच्या किमती स्थिर झाल्या तेव्हा इंधनाचे दर कमी झाले नाहीत. कारण तेल कंपन्या त्यांचा तोटा भरून काढत होत्या. आता या नुकसानीची वसुली पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. असे संकेत तेल कंपन्यांनी दिले. (Petrol Diesel Price on 8 June 2023)
तेल कंपन्यांचे ताळेबंदही नफ्यात आले असून त्यामुळे येत्या काही दिवसांत तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. ही सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. तर ब्रेंट क्रूड तेल 0.16 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 76.90 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याचबरोबर, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.04 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 72.50 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price Today) बदल करण्यात आला. काही ठिकाणी तर तेल महाग झाले आहे, तर काही ठिकाणी इंधन स्वस्त झाले असल्याचे समजते. (Maharashtra Petrol Diesel Rate)
भारतीय तेल कंपन्यांनी गुरूवार (दि. 8 जून) रोजी चे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.
आज पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर) –
दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये
चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये
मुंबई –
पेट्रोल – 106.31 रुपये
डिझेल – 94.27 रुपये
कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये
तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या –
– इंडियन ऑईलचे IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
– इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
Web Title : Petrol Diesel Price Today | petrol diesel price on 8 june 2023 in maharashtra new rates of fuel
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या