Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | मागील काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने (Central Government) इंधनावरील कर कपात केल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पण सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. मात्र आगामी काळात पेट्रोल-डिझेलचा भाव वाढेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

मागील काही दिवसांपासूनही आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरात चढउतार दिसून येत आहे. आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून आज 10 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहे. (Petrol-Diesel Price Today)

मुख्य महानगरांतील आजचा पेट्रोल-डिझेलचा दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 10th june 2022 marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा