Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट; पेट्रोल-डिझेलचे दरही कमी होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड दोन महिन्यांत पहिल्यांदाच 100 डॉलरपर्यंत उतरले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणीमुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर देखील कमी होणार क? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी मंदीच्या शक्यतेमुळे इंधनाचा वापर कमी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. या दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जाहीर केले आहे.

 

आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. जवळपास दीड महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काल आणि आज कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट झाली आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या निर्णयाची घोषणा कधी होणार? आणि गगनाला भिडलेल्या दरात दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

 

मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 110.88 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.74 रुपये
डिझेल – 96.20 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.08 रुपये
डिझेल – 95.59 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.34 रुपये
डिझेल – 95.84 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 7th july 2022 check latest rate of mumbai pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा