Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | नुकतंच केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) इंधनाच्या दरात कपात करुन जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा साधारण 120 रुपये पर्यंत असणारा दर जवळपास 111 रुपये पर्यंत गेला आहे. दरम्यान दुसरीकडे क्रूड ऑईलच्या (Crude Oil Price Hike) वाढत्या दरामुळे पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price Today) पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज (बुधवारी) पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतेही बदल केले नाहीत.

 

वाढत्या महागाईच्या भडक्यामध्ये केंद्राने काहीसा दिलासा दिला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आज सकाळी ब्रेंट क्रूडचा भाव 114 डॉलरवर गेला आहे. जाणकारांनी या आधी जर कच्च्या तेलाचा दर 110 डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

दरम्यान, तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दलही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या (Indian Oil) वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागणार आहे. आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

 

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर –

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

मुंबई –
पेट्रोल – 109.27 रुपये
डिझेल – 95.84 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

 

Web Title :- petrol diesel price today petrol diesel price today on 25 may 2022 check latest rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा