Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : Petrol Diesel Price Today | लागोपाठ तिसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. परिणामी मागील दिवसात डिझेलच्या दरात आज चौथ्यांदा वाढ झाली आहे. सोबतच आज मंगळवारी पेट्रोलसुद्धा महाग झाले आहे. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च आणखी वाढणार असल्याने आगामी काळात अगोदर असह्य झालेली महागाई आणखी भडकणार (Petrol Diesel Price Today) आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलमध्ये आज थेट 25 पैशांची वाढ केली. तर, पेट्रोल 20 ते 22 पैशांनी महाग केले. यापूर्वी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 24, 26 आणि 27 सप्टेंबरला सुद्धा डिझेलचे दर वाढवले होते.

Pune Police Crime Branch | 10 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड

मुंबईत पेट्रोल 107.47, डिझेल 97.21

या वाढीनंतर राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 101.39 रुपये आणि डिझेलचा दर 89.57 रुपये प्रति लीटरवर पोहचला.
मुंबईत सुद्धा पेट्रोल 107.47 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.21 पैसे प्रति लीटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 101.87 रुपये तर डिझेलचा दर 92.67 रुपये लीटर आहे.
तर चेन्नईत सुद्धा पेट्रोल 99.15 रुपये लीटर आहे तर डिझेल 94.17 रुपये लीटरने विकले जात आहे.

देशभरात मागील मागील 5 दिवसात डिझेलचे दर 4 वेळा वाढवल्याने किंमत 95 पैसे प्रति लीटर वाढली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी अलिकडेच 24 सप्टेंबरला 20 पैसे तर 26 आणि 27 सप्टेंबरला 25 पैसे प्रति लीटरची वाढ केली होती. तर, आज लागोपाठ तिसर्‍या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला पुन्हा एकदा दरात 25 पैशांची वाढ केली आहे. अशाप्रकारे डिझेल सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे एक रुपये प्रति लीटरने महागले आहे. आज पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price Today)

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका

पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहचल्याने देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. गरजेच्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कारण सर्व वस्तूंचे वाहतूक भाडे वाढले आहे. 19 राज्यात पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आहे.

यामुळे महागले पेट्रोल आणि डिझेल

पेट्रोल-डिझेलच्या दरात एक्साईज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर टॅक्सचा समावेश केल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतो. परदेशी चलनदरासह अंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर रोज पेट्रोल-डिझेलच्या किमती ठरतात.

हे देखील वाचा

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Petrol Diesel Price Today | petrol diesel prices hike update 28th september increase price today know latest rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update