Petrol Diesel Price Today | पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी; जाणून घ्या आजचे भाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Today | राज्य शासनाने पेट्रोलमध्ये ५ व डिझेलमध्ये ३ रुपयांची कपात करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पुण्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अनुक्रमे ५.०४ रुपये आणि ३ रुपयांनी कमी झाले आहेत.

 

यापूर्वी पेट्रोलचा दर ११०.८७ रुपये लिटर होता, तो आता १०५.८३ रुपये झाला आहे. पॉवर पेट्रोलचा दर पूर्वी ११५.६३ रुपये लिटर होता, तो आता १११.४९ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Today)

 

डिझेलचे दर यापूर्वी ९५.३६ रुपये लिटर होता. त्यात घट होऊन तो आता ९२.३६ रुपये लिटर इतका झाला आहे. सीएनजीचा दर (CNG Price) किलोमागे ८५ रुपये कायम आहे.

 

Web Title :- Petrol diesel prices reduced in Pune Know what to buy todays price

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा