Petrol Diesel Price Today | झटका ! आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

नवी दिल्ली : Petrol Diesel Price Today | सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज लागोपाठ दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर मुंबईत पेट्रोल 107.95 रुपये लीटरवर पोहचले आहे. तर डिझेल 97.84 रुपये झाले आहे. सध्या देशात सर्व शहरात पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च स्तरावर आहेत.

काल पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ झाली होती. बुधवारी किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारी पेट्रोलच्या दरात 20 पैसे वाढवण्यात आले होते. तर, डिझेल 25 पैशांनी महागले होते.

चार महानगरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

– दिल्ली पेट्रोल 101.89 रुपये आणि डिझेल 90.17 रुपये प्रति लीटर

– मुंबई पेट्रोल 107.95 रुपये आणि डिझेल 97.84 रुपये प्रति लीटर

– चेन्नईत पेट्रोल 99.58 रुपये आणि डिझेल 94.74 रुपये प्रति लीटर

– कोलकाता पेट्रोल 102.47 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लीटर

4 दिवसात डिझेलचा दर 4 वेळा वाढला

देशभरात मागील 4 दिवसात डिझेलच्या दरात 4 वेळा वाढ करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी अलिकडेच 24 सप्टेंबरला 20 पैसे तर 26 सप्टेंबरला 25 पैसे प्रति लीटरची वाढ केली होती. तर, 28 सप्टेंबरला पुन्हा दरात 25 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे.

हे देखील वाचा

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महागला? जाणून घ्या 1 ऑक्टोबरचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Petrol Diesel Price Today | petrol price today in delhi near 102 rupees litre and diesel price crosses 90 rs litre

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update